ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

पावसामुळे व रेल्वेच्या डीसाळ कारभारा मुळे प्रवाशांचे अतोनात हाल..!


🔥MK NEWS 36 

बारामती पॅसेंजर बाबत आमदार, खासदार गप्प का ?
दौंड, प्रतिनीधी,

गेले कित्येक दिवस झाले संध्याकाळची पुण्याहून बारामतीसाठी 6.45 मिनिटांनी सुटणारी पॅसेंजर 1 तास उशिरा पोहचत आहे याला नेमके म्हणायचे काय हा प्रश्र्न सद्या उपलब्ध झाला आहे. अनेकांना पुण्याहून बारामती साठी घरी पोहचायचे असते पुणे विभागाचे नेहमीचेच रडगाने झाले आहे. संध्याकाळी पाच वाजून दोन मिनिटांनी दौंड वरून पुण्यासाठी जी डेमो धावते तीच पुन्हा संध्याकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी पुण्याहून बारामतीसाठी तिचा वापर केला जातो. दुपारी तीन वाजता पुण्याहून दौंड साठी जी डेमो येते तीच पुण्याकडे फिरवून पुन्हा तिचाच वापर पुणे बारामतीसाठी केला जातो परंतु दुपारची डेमो पुण्यावरून दौंड साठी जात असताना तिला उशीर का होतो याचे कारण शोधले असता दोन एक्सप्रेस ला पुढे घालून हिला जाणून-बुजून उशीर केला जात आहे
परिणामी पुण्यासाठी धावणाऱ्या गाड्या या या डेमोला पुढे घेतल्या शिवाय दौंड स्थानकातून सोलापूर पॅसेंजर, निजामुद्दीन पॅसेंजर व सहा वाजता येणारी बारामती पुणे पॅसेंजर या सर्व चा समावेश यामध्ये होतो त्यामुळे संध्याकाळी बारामती करिता जाण्यासाठी ही पाच वाजताची डेमो उशिरा पुण्याकडे आल्याने ती बारामतीसाठी उशिरा धावते शिवाय पुन्हा वंदे भारत सुपरफास्ट साठी हि गाडी बाजूला घेऊन उशीर केला जातो. या मार्गावर पॅसेंजर संख्या कमी असल्याने पुणे विभाग जाणून बुजून याचा फायदा घेत आहे एक तर यांना नवीन लोकल सुरू करण्यास उशीर झाला आहे शिवाय दोन स्वतंत्र लाईन साठी यांच्याकडे प्रस्तावत दिल्लीला गेलेला नाही असे समजायचे का ? ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांची कन्या व येथील कित्येक वर्ष या मतदार संघाचे नेतृत्व करतात त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे की नाही


Translate »
error: Content is protected !!