ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“व्हिजिटच्या नावाखाली गायब! पळसमंडळ उपकेंद्रात आरोग्य सेवकांचा बोगस कारभार उघड?”


🔥MK NEWS36 

🛑 पळसमंडळ उपकेंद्रात बोगस कारभार? “व्हिजिट”च्या नावाखाली गैरहजेरीचा खेळ उघड?

(सागर समिंदर प्रतिनिधी)

पळसमंडळ (ता. माळशिरस) येथील उपकेंद्रात आरोग्य सेवक व नर्स यांच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे १७०० लोकसंख्या असलेल्या या गावात आरोग्य सेवा देण्यासाठी नेमलेले कर्मचारी प्रत्यक्षात कितपत हजर असतात, यावरच आता संशय व्यक्त होत आहे. “व्हिजिटला गेलो” हा एकच बहाणा सांगत वारंवार गैरहजेरी लपवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे धक्कादायक आहे — “हा आरोग्य सेवक नेमका कोण, आम्ही त्याला कधी पाहिलंच नाही!” गावात आरोग्य सेवकाची ओळखच नसल्याचा दावा होत असल्याने उपकेंद्राचा कारभार कागदोपत्रीच चालतोय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, उपकेंद्रातील नर्सबाबतही तितकीच गंभीर बाब समोर आली आहे. साफसफाई कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मॅडम ऑनलाईन मीटिंगसाठी गेल्या आहेत,” असे सांगण्यात आले. मात्र तासाभराने पुन्हा भेट दिल्यावर मॅडम उपस्थित दिसल्या, आणि त्यांनी “व्हिजिटला गेले होते” असे सांगितले. या विरोधाभासी विधानांमुळे “नेमकी ही व्हिजिट कुठे चालते?” हा सवाल अधिकच गडद झाला आहे.

या सगळ्या प्रकाराला फोंडशिरस येथील मुख्य आरोग्य केंद्रातील परिस्थितीही कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. तेथील दोन्ही डॉक्टर वारंवार अनुपस्थित असतात, अशी माहिती समोर आली आहे. नर्सकडे विचारणा केल्यास “जेवायला गेले” किंवा “बाहेर गेले” अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे उपकेंद्र आणि मुख्य केंद्र यांच्यातील समन्वय पूर्णपणे कोलमडला असल्याचे चित्र दिसत आहे.

आरोग्य सेवक तर “नेहमीच व्हिजिटवर” असल्याचे सांगितले जाते. पण त्या व्हिजिटची नोंद, ठिकाण किंवा लाभार्थी याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. परिणामी, ही सर्व व्यवस्था केवळ कागदोपत्रीच चालते का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.

या प्रकाराकडे माळशिरस तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणार का? की एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार? पण यात काही घटना घडली तर याला पूर्ण जबाबदार तालुका आरोग्य अधिकारी असणार कारण वारंवार सांगूनही त्यांना पुराव्यासहित गोष्टी अनुपस्थितीत फोटोसहीत देऊन सुद्धा या गोष्टीकडे ते वारंवार दुर्लक्ष करत आहे त्यामुळे काही घटना अपघात घडली तर याला पूर्ण जबाबदार हे तालुका आरोग्य अधिकारी असतील का ह्या सर्व गोष्टी माहिती असून सुद्धा जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे? असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?

तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा MK NEWS36 तर्फे १००% सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


Translate »
error: Content is protected !!