दौंड पोलिसांची धडक छापा कारवाई – 180 किलो चंदन जप्त..!
🔥MK NEWS 36
दौंड पोलिसांची धडाकेबाज कारवाई..!
कुरकुंभ MIDC मध्ये १.८० लाखांचे चंदन जप्त – चार जण अटकेत, एक फरार
दौंड, दि. 29 (प्रतिनिधी : कोमल सोनवणे)
कुरकुंभ MIDC परिसरात पहाटेच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकून तब्बल 180 किलो वजनाचे 9 चंदनाचे ओंडके, किंमत सुमारे ₹1,80,000, जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
मौजे कुरकुंभ MIDC येथील अल्कली अमाईन कंपनीजवळ काही इसम चंदनाची झाडे तोडून चोरीस नेत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी पाठलाग करून चार जणांना पकडले.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
1. नितीन संजय माने (38, रा. नीरा, ता. पुरंदर)
2. भाऊसाहेब गोरख जाधव (27, रा. देलवडी, ता. दौंड)
3. लहू तानाजी जाधव (36, रा. दापोडी, ता. दौंड)
4. अनिल अशोक माने (40, रा. केडगाव चौफुला, ता. दौंड)
तर त्यांचा साथीदार दिगंबर बलाशा काळे (40, रा. वाखरी चौफुला, ता. दौंड) हा फरार झाला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी संजय कोठावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. 631/2025 भा.दं.सं. कलम 303(2), 329, 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस हवालदार पठाण, सागर म्हेत्रे, किरण पांढरे, संजय कोठावळे, निखिल जाधव व अमीर शेख यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार किरण ढुके करीत आहेत.




