ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

माळेगाव नगरपंचायतीतील रोजंदारी कामगारांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा लढा..!


🔥MK NEWS36 

माळेगाव नगरपंचायतीतील रोजंदारी कामगारांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा लढा..

माळेगाव : माळेगाव ग्रामपंचायतीपासून अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ पुढाकार घेणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.

माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरही येथे कार्यरत असलेल्या रोजंदारी कामगारांना किमान वेतन, पी.एफ., विमा सुविधा, साप्ताहिक सुट्टी तसेच शासन सेवेत कायम करण्याच्या मागण्या प्रलंबित असल्याचे कामगारांनी संघाकडे मांडले. या मागण्यांबाबत मदत करण्याची विनंतीही कामगारांनी केली.

यासंदर्भात जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, बारामती शहराध्यक्ष आकाश शिंदे, शहर कार्याध्यक्ष निखिल सरोदे व रोजंदारी कामगारांनी माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांची भेट घेतली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

या वेळी नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू तसेच शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मुद्द्यांबाबतही पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, माळेगाव नगरपंचायतीतील कामगारांना किमान वेतन, सेवेत कायम करणे तसेच इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढा सुरू ठेवणार असल्याचे गौरव अहिवळे यांनी स्पष्ट केले.


Translate »
error: Content is protected !!