ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

केडगाव आंदोलनाला मोठे यश; महावितरणने मागितली १५ दिवसांची मुदत..!


🔥MK NEWS36 

केडगाव महावितरण आंदोलनकर्त्यांपुढे नमले; भरनियमन स्थगित करण्यासाठी १५ दिवसांची मुदत..!

सचिन आटोळे | दौंड विशेष प्रतिनिधी

दौंड व शिरूर तालुक्यात संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत करण्यात येणाऱ्या भरनियमनाच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले असून, आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेसमोर महावितरण प्रशासनाने माघार घेत मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शविली आहे. दि. ४ मे २०२६ पासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरण अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत लेखी पत्राद्वारे १५ दिवसांची मुदत मागितली.

महावितरणचे अधिकारी श्री. आल्हाट, श्री. कटके, श्री. चौगुले, श्री. टेंगले यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेतली. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नांनगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत उघडे, समुदाय आरोग्य अधिकारी अमृता ढेबे, आरोग्य सहाय्यक राणू नेवसे तसेच आरोग्य सेविका बी. एम. ढाके यांनी आंदोलनस्थळी आरोग्य सेवा पुरविली. पोलीस विभागानेही परिस्थिती नियंत्रणात ठेवत सहकार्य केले.

या आंदोलनाला पुरोगामी संघटना महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय फुले ब्रिगेड, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, त्रिदल महिला शक्ती आघाडी, ग्राहक कल्याण फाउंडेशन, माहिती अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य आदी विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता.

आंदोलनामध्ये इब्राहिम शेख, अमरदादा जोगदंड, मारुती पठारे, अमोल भागवत, गणेश जगताप, आप्पा कवठाळे, तुकाराम निंबाळकर, सुरेश पवार, जनार्दन मोटे, पद्माकर देशमुख, सोमनाथ सकट, दिलीप रुपनवर, जीवन मोटे, बिट्टू खोडवे, साईनाथ शिंदे, सतीश खताळ, रोहिदास चोरमले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिला भगिनींचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.

विशेषतः सामाजिक कार्यकर्ते राजू काका आढागळे व ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडनवर यांनी आंदोलनाचे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच शिवाजी फराटे, तुकाराम निंबाळकर, गणेश थोरात, भिवाजी गरदडे, भानुदास नेवसे, डॉ. खताळ, सुनील मोहिते, धुळाजी सोडनवर, महेश अण्णा भागवत, अर्जुनराव टूले यांनी समेट घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, १५ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.


Translate »
error: Content is protected !!