ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनराजकीयसामाजिक

निरवांगी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर; वॉर्डनिहाय आरक्षणामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली!


🔥MK NEWS36 

निरवांगी ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत उत्साहात संपन्न; इच्छुकांची धाकधूक संपली!

विशेष प्रतिनिधी (सागर समिंदर)

निरवांगी: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित अशी निरवांगी ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत २०२२ अत्यंत उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात संपन्न झाली. दिनांक १२ जून २०२६ रोजी जाहीर झालेल्या या सोडतीमुळे अनेक इच्छुकांची धाकधूक संपली असून, गावातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.

मंडळ कृषी अधिकारी तथा अध्यक्ष अध्याशी अधिकारी श्री. एम. एस. चितारे आणि ग्राम महसूल अधिकारी तथा सहाय्यक अध्याशी अधिकारी श्री. अविनाश रा. खोकले यांच्या मुख्य उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही आरक्षण प्रक्रिया अधिकृतपणे पार पडली.

📌 या सोडतीमध्ये गावातील एकूण ३ वॉर्डांचे आरक्षण खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे:

📍वॉर्ड क्रमांक १:

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

सर्वसाधारण

सर्वसाधारण महिला

📍वॉर्ड क्रमांक २:

सर्वसाधारण महिला

सर्वसाधारण महिला

सर्वसाधारण

(टीप: या वॉर्डात महिलांसाठी दोन जागा आरक्षित झाल्याने महिला उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.)

📍वॉर्ड क्रमांक ३:

अनुसूचित जाती जमाती महिला (ST Female)

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC Female)

सर्वसाधारण

1🎈ग्रामस्थांची व आजी-माजी पदाधिकार्‍यांची मोठी उपस्थिती..

हा आरक्षण सोडत सोहळा पाहण्यासाठी निरवांगी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ग्रामसेवक श्रीमती रणवरे मॅडम, विद्यमान सरपंच सुरेखा चांगदेव गुरव, माजी सरपंच कामिना पोळ पाटील, माजी उपसरपंच पेडकर, माजी उपसरपंच शंकर शेंडे यांच्यासह गावातील सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील बापूराव रासकर यांनी चोख भूमिका बजावली. आरक्षण जाहीर होताच कुठे आनंदाचे तर कुठे चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. एकूणच या आरक्षण सोडतीमुळे निरवांगी गावच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून, इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.


Translate »
error: Content is protected !!