ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

दौंड नगरपरिषदेकडून बौद्ध समाजावर अन्याय?


🔥MK NEWS 36 

दौंड प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद व मुख्याधिकारी यांच्याकडून बौद्ध समाजावर अन्याय?

दौंड शहरात बौद्ध समाज व अनुसूचित जातींवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे. नगरपरिषद व मुख्याधिकारी यांना खेळवणारा एक मोठा नेता बौद्ध समाजाला वेढ्यात घेत असल्याची टीका होत आहे.

दौंड शहरातील बौद्ध विहाराचे काम गेल्या पाच वर्षांपासून ठप्प होते. त्यावेळी काही स्थानिक नेत्यांनी काम रोखले होते. मात्र पँथर जयदीप बगाडे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित नेत्याला बजावणी करून ते काम कायदेशीर मार्गाने सुरू करण्यास भाग पाडले. तरीसुद्धा सध्या हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून पुन्हा अडथळ्यांत सापडले आहे.

याउलट, दुसऱ्या एका समाजासाठी दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित नेता पुढाकार घेऊन नगरपरिषदेकडील सार्वजनिक शौचालय पाडून समाज मंदिर उभारण्यास प्राधान्य देत असल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिकांचा प्रश्न असा आहे की – सार्वजनिक शौचालय तोडून समाज मंदिर उभारणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का? विशेषतः अशा वेळी, जेव्हा दौंड शहरात नागरिकांसाठी पुरेशा शौचालयांची कमतरता भासत आहे.

स्थानिकांच्या मते, सार्वजनिक शौचालय पाडून व्यावसायिक गाळे उभारले जात आहेत आणि काही कार्यकर्त्यांना त्याचा लाभ मिळतो आहे. पण याउलट शहरात बौद्ध समाजाची लोकसंख्या लक्षणीय असतानाही बौद्ध विहाराचे काम अडथळ्यातच राहिले आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे की – बौद्ध समाजाचे नेते याबाबत मौन का बाळगून आहेत? ते लाचार झाले आहेत का?

या संदर्भात लवकरच नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव व नगरपरिषद संचालनालय येथे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे पँथर जयदीप बगाडे यांनी सांगितले. यापूर्वीही या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून आयोगाने जिल्हाधिकारी व दौंड नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

या प्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी व राजकीय नेत्यांवर कायदेशीर व संवैधानिक फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.


Translate »
error: Content is protected !!