ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

काळूराम चौधरींची दौंडमध्ये तुफान फटकेबाजी; आमदार कुल, प्रेमा शेठ व राष्ट्रवादीवर थेट निशाणा..!


🔥MK NEWS36

काळूराम चौधरी यांची दौंडमध्ये तुफान राजकीय फटकेबाजी; आमदार कुल, प्रेमा शेठ व राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा..!

सचिन आटोळे – दौंड (विशेष राजकीय प्रतिनिधी)

दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीचा ताप वाढत असतानाच बारामतीची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे काळूराम चौधरी यांनी सोमवारी दौंडमध्ये तुफान फटकेबाजी करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले. बहुजन समाज पार्टीने (BSP) त्यांना दौंडच्या प्रचारासाठी विशेष जबाबदारी सोपवली असून नगराध्यक्ष उमेदवार पुष्पा मनोहर कोकरे यांच्यासह पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली.

सभेचे आयोजन शहरातील दोन मध्यवर्ती ठिकाणी—हुतात्मा चौक व संत गाडगेबाबा चौक परिसरात— करण्यात आले होते. अपेक्षित गर्दी नसली तरी उपस्थिती समाधानकारक होती. नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा, साडेसातच्या सुमारास सभा सुरू झाली.

सभेची सुरुवात बहुजन समाज पार्टीचे स्थानिक नेते सुनील शिंदे यांनी केली. त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर थेट हल्ला चढवत “दौंडची अवस्था बिकट आहे, विकास ठप्प आहे” असा आरोप केला. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी अजित ठोकळे यांनी “शहरात मुतारी नाही, तर मतदानाला कशाला?” असा सवाल करत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गेल्या निवडणुकीत बसपाच्या आमदारकीसाठी उभे राहिलेले योगेश कांबळे यांनी केले, तर शेवटी मनोहर कोकरे यांनी आभारप्रदर्शन केले.

यानंतर मंचावर आलेल्या काळूराम चौधरी यांनी आमदार राहुल कुल, प्रेमा शेठ आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट निशाणा साधत दौंडच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
“बारामतीमध्ये वन बीएचके फ्लॅट मिळू शकतात, मग दौंडमध्ये का नाही?” असा थेट सवाल उपस्थित करत, बसपाला सत्ता दिल्यास वन बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.

बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कौतुक करत, “हत्तीचे चिन्ह म्हणजे बाबासाहेबांची शक्ती—ते पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे,” असे चौधरींनी ठामपणे सांगितले.

बसपाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये—
• प्रभाग १ (अ) : हर्षल राजू पाटोळे
• प्रभाग १ (ब) : प्रमिला रोबेन पवार
• प्रभाग २ : तुषार सुभाष सवाणे
• प्रभाग ३ : अझर मोहियोद्दीन कुरेशी
• प्रभाग ६ (अ) : श्रीकांत आनंद सोनवणे

दौंडच्या राजकारणात ही सभा बसपाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात असून, काळूराम चौधरी यांच्या फटकेबाजीमुळे आगामी निवडणुकीत मतदारांचे समीकरण कितपत बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Translate »
error: Content is protected !!