मोबाईल फुटला, नाते तुटलं… पण तपासही फुटला का? वरवंड आत्महत्या प्रकरणात पोलिसांची संशयास्पद शांतता का?
🔥MK NEWS36
वरवंड तरुणी आत्महत्या प्रकरण : हॉटेलजवळील कडाक्याच्या? भांडणानंतर दुसऱ्याच दिवशी फाशी
वादाचा विषय काय होता? युवकाची अद्याप चौकशी का नाही? पोलिस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह..
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
वरवंड येथील दलित तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस नवे धक्कादायक पैलू समोर येत असून, या घटनेमागील सत्य दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा सवाल आता नागरिकांमध्ये जोर धरू लागला आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशी संबंधित तरुणी व एका युवकामध्ये गावातील एका हॉटेलजवळ कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती समोर येत असून, हे भांडण इतक्या टोकाला गेले की संतापाच्या भरात तरुणीने आपला मोबाईल फोन तिथेच फोडल्याचे नागरिकांचे चर्चा व सांगितले आहे यात कितपत सत्य?
महत्त्वाची बाब म्हणजे, या भांडणानंतर दुसऱ्याच दिवशी सदर तरुणीने फाशी घेऊन आपले जीवन संपवले. त्यामुळे हे केवळ आत्महत्या प्रकरण आहे की आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला होता का?
प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता का? मात्र वाद इतका विकोपाला गेला होता की दोघेही संतप्त अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगितले जाते. मात्र नेमके कोणते हॉटेल, वादाचा विषय काय, आणि वादानंतर नेमके काय घडले याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
युवकाची चौकशीच नाही; कारण काय?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्याच्यासोबत तरुणीचे शेवटचे गंभीर भांडण झाले, त्या युवकाला पोलिसांनी आजतागायत साध्या चौकशीसाठीही बोलावलेले नाही.
ना त्याला नोटीस, ना समन्स, ना त्याचे नाव अधिकृतरीत्या तपासात नमूद — हे सर्व पाहता पोलिस तपासाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे.
नागरिकांमध्ये चर्चा आहे की, त्या युवकाचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे का? कॉल रेकॉर्ड, चॅट्स, लोकेशन तपासले गेले आहे का? मोबाईल घटनास्थळी फुटलेला असताना डिजिटल पुरावे सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी नेमकी कोणती पावले उचलली, याची कोणतीही स्पष्टता नाही.
“नातेवाईकांची तक्रार नाही” हा पोलिसांचा दावा कितपत योग्य?
पोलीस प्रशासनाकडून असा युक्तिवाद केला जात आहे की, मृत तरुणीच्या नातेवाईकांनी अद्याप लेखी तक्रार दिलेली नाही. मात्र कायद्यानुसार, संशयास्पद मृत्यू, आत्महत्येस प्रवृत्तीचे संकेत, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि सार्वजनिक चर्चा असताना पोलीस स्वतः फिर्यादी होऊन (सुओ मोटो) तपास पुढे नेऊ शकतात.
मात्र तसे न करता तपास थंडावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
न्याय मागण्याची तयारी
या संपूर्ण प्रकरणात अनेक अनुत्तरित प्रश्न असून, तरुणीच्या मृत्यूमागील सत्य बाहेर येणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ “आत्महत्या” म्हणून फाईल बंद करण्याऐवजी, आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या घटना, मानसिक दबाव, वादाचे स्वरूप आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
येणाऱ्या काळात या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व कायदेशीर चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि मृत तरुणीला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




