समाजकारणाची दिशा देणाऱ्या वसुमतीताई गावडे यांचे निधन – सामाजिक क्षेत्रात हळहळ
🔥MK NEWS 36
दौंड प्रतिनिधी
पुणे – पुणे जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले सेवानिवृत्त अधिकारी मा. प्रभाकर बापुराव गावडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे, ह.मु. पुणे) यांच्या सुविद्य पत्नी तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सौ. वसुमती (ताई) प्रभाकर गावडे यांचे आज दुपारी चार वाजता पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
स्व. वसुमतीताई गावडे..
स्व. वसुमतीताई गावडे यांनी आयुष्यभर समाजकारण, विधी व्यवसाय आणि महिलांच्या प्रश्नांवर काम केले. सामाजिक कार्यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनाने गावडे परिवारासह सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती, मुलं, नातवंडे, आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी पुणे येथे पार पडणार असून, या दुःखद प्रसंगी सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.




