ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते महापुरुषांना विनम्र अभिवादन..!


🔥MK NEWS36

माळशिरस प्रतिनिधी : सागर समींदर

मौजे मेड येथे संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला.

या प्रसंगी आमदार उत्तमरावजी जानकर साहेब व जिल्हा परिषद सदस्य अर्जुन सिंह मोहिते पाटील साहेब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या या अभिवादनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. विविध सामाजिक संदेश देणारे फलक, बॅनर तसेच तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वातावरण प्रेरणादायी बनले होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विष्णुपंत नार, नवर मिलिंद सरतापे, पंचायत समिती सदस्य युवराज तात्या झंजे, अतुल सरतापे, सरपंच दीपक लवटे, रजनीश बनसोडे, शिवाजी लवटे, बाळासाहेब विठ्ठल तोरणे, शहाजी आढाव, डॉ. विकास धनंजय, नवनाथ कांबळे, प्रवीण तोरणे, नाना तोरणे, प्रेम सरतापे, नितीन जाधव, पोपट सरतापे, विकी भिसे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्धांच्या अहिंसा, करुणा आणि समतेच्या विचारांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजाने या महान विचारांचे अनुकरण करून एकात्मतेने पुढे जाण्याचे आवाहन केले.

संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील नागरिकांनी एकजुटीने सहभाग घेत या जयंती सोहळ्याला यशस्वी केले.


Translate »
error: Content is protected !!