“जनतेचा रक्षक की भ्रष्टाचाराचा जनक?
🔥MK NEWS 36 संपादकीय
होमगार्ड संस्थेतील भ्रष्टाचाराचा मायाजाळ – संधीचं सोनं करणारे जनक कोण?
बारामती तालुक्यातील होमगार्ड संस्था म्हटलं की, सामान्य माणसाला पोलीस दलासारखाच भास व्हायचा. कारण होमगार्डचे राहणीमान, गणवेश व ड्युटी करण्याची पद्धत ही पोलिसांशी मिळतीजुळतीच. मात्र या संस्थेमध्ये गेल्या काही वर्षांत “संधीचं सोनं” करणारे काही जण पुढे आले असून, भ्रष्टाचाराचा असा अड्डा तयार केला आहे की, सामान्य होमगार्डला न मिळणारा हक्काचा मोबदला ठराविक लोकांच्या खिशात जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
ड्युटी लावण्याचा खेळ – ‘वरिष्ठांचे आलेली यादी’ स्वतःच्या फायद्यासाठी एडिट होती का? ‘
बंदोबस्तासाठी वरिष्ठांची आलेली अधिकृत यादी असताना देखील ती न वापरता, वेगळी एडिट केलेली यादी वापरली जाते का ?त्यातून ठराविक लोकांनाच ड्युट्या मिळतात. होमगार्डला सरासरी १३०० रुपये दिवसाला मिळतात. १० दिवसांचा बंदोबस्त झाला, तर साधारण १३ हजार रुपये मोबदला होतो. यामध्येच ३ हजार रुपये कमिशन या भ्रष्ट चक्रातून वरच्या पातळीवर जात असल्याचा आरोप आहे?

“जो पैसे देईल तो बंदोबस्त करेल” अशीच परिस्थिती झाली असून, रोटेशनप्रमाणे ड्युटी न लावता फक्त ‘फेवर’ असलेल्या किंवा पैसे देणाऱ्या होमगार्डलाच सतत बंदोबस्तासाठी बोलावले जाते का?
दरमहा खंडणी – मानसिक छळाचे शस्त्र..!
याशिवाय, जे होमगार्ड बारामती व आसपासच्या पोलिस ठाण्यांशी संबंधित आहेत, त्यांच्याकडून दरमहा ठराविक रक्कम उकळली जाते. पैसे दिले नाहीत तर त्यांना मानसिक त्रास, ड्युटी न लावणे, हलाखीत ढकलणे अशी वागणूक दिली जाते. त्यामुळे अनेक होमगार्ड आर्थिक, मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत.

लाखो रुपयांची प्रॉपर्टी – भ्रष्टाचारातून उभारलेले साम्राज्य?
या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काही व्यक्तींनी बारामतीत लाखो रुपयांचे प्रॉपर्टी साम्राज्य उभारले आहे. ज्यांच्याकडे थोड्याच वर्षांत उंच इमारती, गाड्या, प्लॉट्स, शेतजमीन आली, त्यांच्या संपत्तीचे स्त्रोत कुठून आले असा प्रश्न उपस्थित होतो. सामान्य होमगार्ड मात्र रोजच्या रोज हक्काची ड्युटी व पगारासाठी धडपड करताना दिसतो.
प्रश्न उभा – या भ्रष्टाचाराचा जनक कोण?
आज प्रश्न असा आहे की, या “संधीचं सोनं” करणाऱ्या भ्रष्टाचाराचा जनक कोण?
ड्युट्या लावण्यात फेरफार करून पैसे कमवणारे कोण?
बंदोबस्ताच्या नावाखाली लाखो रुपयांची उकळणारे कोण?
होमगार्डांच्या मानसिक छळामागे कोण?सर्वसामान्य होमगार्डचे आयुष्य आजही हलाखीचे आहे. त्याला ना सामाजिक प्रतिष्ठा, ना पुरेसा मोबदला. पण दुसरीकडे त्याच्या नावावर ड्युटी दाखवून, कमिशनखोरी करून, बंदोबस्ताचे सोने करणाऱ्यांचा गैरव्यवहार सुरूच आहे का?
👉 बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात होमगार्ड संस्थेवर गंभीर आरोप झाले असून, याची चौकशी करून भ्रष्टाचाराचा जनक उघड करण्याची मागणी आता उग्र होत आहे.




