ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

‘इथे काहीतरी चुकीचं आहे’ म्हणणारे अधिकारीच गप्प! मग गुन्हा नोंद का नाही?


🔥MK NEWS36 

बारामतीतील कटफळ केमिकल रेड : कारवाई होती की राजकीय स्क्रिप्ट? नियमबाह्य रेड, अपूर्ण पंचनामा आणि ‘क्लीन चिट’चा संशय?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

बारामती |
बारामती येथील कटफळ एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीवर टाकण्यात आलेली एक्साईज विभागाची रेड ही कारवाई होती की ठरवून आखलेली राजकीय स्क्रिप्ट? असा गंभीर सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. कारण या रेडमध्ये एक ना अनेक धक्कादायक, नियमबाह्य आणि संशयास्पद बाबी समोर येत आहेत.
रेड झाली… गदारोळ झाला… व्हिडिओ समोर आले… अधिकाऱ्यांनी “काहीतरी चुकीचं सुरू आहे” असे स्पष्ट संकेत दिले… तरीही ना गुन्हा दाखल, ना कंपनी मालकावर कारवाई! हे नेमकं का?
🔴 रेडमध्ये नेमकं काय संशयास्पद?
रेडदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की,
“आम्हाला केमिकल सॅम्पल तपासायचे आहेत”
“रात्री उशिरापर्यंत कंपनी चालू आहे”
“इथे काहीतरी चुकीचं घडत आहे”
असे स्पष्ट शब्द अधिकाऱ्यांकडून ऐकू येतात.
मात्र प्रश्न असा की, एवढे स्पष्ट संशय व्यक्त करूनही पुढे काहीच का घडलं नाही?
❓ एक्साईजला अधिकार नव्हते, तरी रेड कशी?
या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे — जर एक्साईज विभागाला केमिकल तपासणीचे अधिकारच नव्हते, तर
👉 संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा विभाग किंवा इतर सक्षम खात्यांशी संपर्क का केला गेला नाही?
👉 समन्वय साधून रेड ‘सक्सेसफुल’ का करण्यात आली नाही?
हे अपयश अनवधानाने झाले की मुद्दाम?
📄 कागदपत्रे तपासलीच नाहीत!
अधिकाऱ्यांनी स्वतः मान्य केल्याप्रमाणे —
🏭कंपनीचे परवाने
📠मालकाचे डॉक्युमेंट्स
🛢️उत्पादन व साठा नोंदी
हे सर्व तपासणे “आमच्या अधिकारात येत नाही” असे सांगून टाळण्यात आले.
मग प्रश्न असा उरतो की, 👉 जर कागदपत्रेच तपासायची नव्हती
👉 तर ही रेड नेमकी कशासाठी होती?
🕰️ वेळेचा घोळ : संध्याकाळी रेड, दुपारी पंचनामा!
रेड संध्याकाळी करण्यात आली,
पण पंचनामा मात्र दुपारी केल्याची नोंद!
हा वेळेचा घोळ चुकून झाला की पुरावे पुसण्यासाठी केला गेला?
कायद्याच्या दृष्टीने हा गंभीर नियमभंग नाही का?
🏛️ राजकीय ‘क्लीन चिट’चा संशय?
या संपूर्ण प्रकरणात आता राजकीय पार्श्वभूमीची जोरदार चर्चा सुरू आहे.
ही रेड तिकीट वाटपाच्या काळातच का झाली?
संबंधित केमिकल कंपनीचा मालक व नगरसेविकाचे पतीचा काही संबंध आहे का?
आधी बारामतीत कार्यक्षेत्र, मग एमआयडीसीतून तिकीट — हे योगायोग आहेत का?
तिकीट वाटप करणाऱ्या राजकीय व्यक्तींशी या कंपनीचे लागेबांधे आहेत का?
हे प्रश्न आज बारामतीतील चहाच्या टपरीपासून ते चौकाचौकात चर्चेचा विषय झाले आहेत.
⚠️ रेड नावापुरतीच होती का?
एवढ्या गंभीर संशयांनंतरही —
✍🏻घाईघाईने पंचनामा
🕵️अपूर्ण तपास
🙆‍♂️कोणतीही FIR नाही
कुठलाही गुन्हा दाखल नाही
यामुळे एकच प्रश्न उरतो — 👉 ही रेड फक्त नावापुरती, “दाखवण्यासाठी” तर नव्हती ना?
📰 MK NEWS 36चा ठाम लढा
या प्रकरणात अन्याय झाला आहे.
आणि अन्यायाला वाचा फोडणं हेच पत्रकारितेचं खरं काम आहे.
MK NEWS 36 च्या माध्यमातून —
या रेडमधील प्रत्येक नियमबाह्य बाब
💥प्रत्येक अपूर्ण कागदपत्र
💥प्रत्येक राजकीय हस्तक्षेप
💥यांचा कागदोपत्री, पुराव्यांसह पाठपुरावा केला जाणार आहे.
प्रशासनाला प्रश्न विचारले जातील,
अधिकाऱ्यांकडून उत्तरं घेतली जातील,
आणि सत्य जनतेसमोर आणले जाईल.
✊ वाचत रहा… पाहत रहा…
कारण, 👉 अन्याय हा अन्यायच असतो
👉 आणि त्याविरुद्ध उभं राहणं हेच आमचं काम
– MK NEWS 36


Translate »
error: Content is protected !!