श्री महाकाळेश्वर युथ फाऊंडेशन आयोजित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…
श्री महाकाळेश्वर फाउंडेशन आयोजित धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज ३६८ जयंती उत्सव 2025 उत्साहात संपन्न…
बारामती सूर्यनगरी [१४/०५/२०२५]: श्री महाकाळेश्वर युथ फाउंडेशनच्या वतीने यंदा छत्रपती संभाजी महाराज जयंती 2025 उत्सव अत्यंत जल्लोषात आणि अभिमानपूर्वक साजरा करण्यात आला. या भव्य कार्यक्रमात युवकांनी उत्साहाने सहभाग घेत इतिहासातील पराक्रमी योद्धा संभाजी महाराजांना अभिवादन केले…
कार्यक्रमाची सुरुवात भव्य मिरवणुकीने व मर्दानी खेळ आणि शिवकालीन वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या. उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीनंतर आयोजित सभेमध्ये विविध प्रमुख पाहुण्यांचे संभाजी महाराजांच्या शौर्य, धर्मनिष्ठा आणि स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठेवर भाष्य केले…
प्रमुख व्याख्याते, पाटील सर व सिने अभिनेत्री श्रद्धा शिंदे… यांचे दोघांचेही जोरदार व्याख्यान झाले...
फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांचे स्वागत हर्षल तोरणे, आदि जाधव, अविष्कार ढवळे, कार्तिक मांढरे यांनी केले..
“संभाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते एक विद्वान आणि नीतिमान राजा होते. त्यांच्या जीवनातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.”
या कार्यक्रमात मुलामुलीं चे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती हनुमंत पाटील (रीजनल ऑफिसर), सोमनाथ गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते) गणेश बोरावके (युवा उद्योजक).. अमोल तोरणे {डिस्ट्रिक्ट ब्युरो चीफ, दैनिक नवराष्ट्र (नवभारत ग्रुप)} निलेश खराडे (युवा नेते) , ऋषिकेश फाळके (उपसरपंच गुणवडी), धनंजय जमदाडे (जळोची विकास सेवा सोसायटी संचालक)
या कार्यक्रमासाठी गणेश पवार, अविराज टेकवडे, चेतन्य घाडगे, सुजित चव्हाण, ओंकार पवार, गणेश चव्हाण, दीपक गायकवाड, विशाल चव्हाण, नितीन खोत, सागर टिंगरे, शुभम जाधव,प्रेम लोखंडे.. यांनी मेहनत घेतली…
कार्यक्रमाचे आयोजक… गणेश खराडे, अक्षय माने, प्रदीप गायकवाड, अक्षय शेरे….
शेवटी, दीप प्रज्वलन व संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…




