ब्रेकिंग न्यूजराजकीय

माळेगावच्या साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या पीडीसीसी बँकेत नेमक प्रकरण काय..


🛑 एम के न्यूज विशेष बातमी 🛑
📍 पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजता सुरू – माळेगाव सहकारी कारखान्याच्या सभासद याद्या – हा प्रकार नक्की काय?

बारामती (प्रतिनिधी):
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात पीडीसीसी बँक  मध्यरात्री ११ वाजता उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या विशेष फुटेजनुसार, काही व्यक्ती रात्रीच्या वेळी बँकेत प्रवेश करताना स्पष्ट दिसतात.

🔍 कोणाच्या आदेशावरून?

बँकेच्या मात्र याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत लेखी आदेशाची नोंद उपलब्ध नाही. का बँक उघडे होते..

📑 माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासद याद्या

या कारवाईदरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या व कागदपत्रे घेण्यात आली आहेत. यामागे नेमका उद्देश काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

मात्र, हे सगळं आगामी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने राजकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही.

❓प्रश्न अनुत्तरित:

रात्रौ बँक उघडण्याची गरज का भासली?

कोणत्या अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले?

सभासदांच्या याद्यांचा गैरवापर तर होणार नाही ना?

या घटनेत कोण कोण सामील आहे?

हा प्रकार केवळ नियमभंग नाही, तर संपूर्ण सहकारी संस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे..

एम के न्यूज आपल्या हक्कासाठी आवाज उठवत राहील.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे…

📰 आपली विश्वासू बातमी संस्था – एम के न्यूज..
www.mknews3600@gamail.com#MaalegaonElection2025


Translate »
error: Content is protected !!