“परेड, वर्दी अनुदान व बंदोबस्ताचा लाखोचा खेळ – हक्कापासून वंचित जवान!”
🔥MK NEWS 36 संपादकीय
🔥 होमगार्ड विभागाचा भ्रष्टाचाराचा महास्फोट – जवानांच्या घामाचे लाखो रुपये भ्रष्ट वरिष्ठांच्या व प्रमुखाच्या खिशात जातोय का?
होमगार्ड जवानांना मिळणारे मानधन, वर्दीचे अनुदान, बंदोबस्ताची रक्कम – या सर्वच हिशोबात भ्रष्ट वरिष्ठ व प्रमुखांनी लाखो रुपयांचा काळाबाजार उभा केला आहे?
👉 परेड अनुदान हिशोब
475 जवान × ₹720 = ₹3,42,000
पण या पैकी जवानांच्या हातात खरंच किती पोहोचतं? उरलेले पैसे कुठे जातात, हा नागरिक आणि जवानांना सतावणारा गंभीर प्रश्न आहे.
👉 वर्दी अनुदान हिशोब
475 जवान × ₹2,500 = ₹11,87,500
जवानांना वर्दीचं अनुदान कागदावर मंजूर होतं. पण या रकमा खरोखर त्यांच्या खात्यावर जमा झाल्या का? की या पैशातून भ्रष्ट प्रमुखांचे बंगले, फ्लॅट आणि गाड्या उभ्या राहतात?
👉 बंदोबस्ताचा खेळ
25 जवान × 10 दिवस × ₹1,300 = ₹3,25,000
हा फक्त 10 दिवसांचा हिशोब. एका महिन्यात बंदोबस्ताची रक्कम लाखो रुपयांपर्यंत जाते. प्रत्येक बंदोबस्तासाठी 3000 रुपयांची लाच दिल्याशिवाय ड्युटी मिळत नाही का? ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना दोन-दोन वर्षे ड्युटीच लागत नाही का?
💥 हा भ्रष्टाचाराचा जनक कोण?
बंदोबस्ताचं रुटींग संपायच्या आधीच ठराविक लोकांना ड्युटी लावली जाते.
जे महिनाभर परेडलाच हजर राहत नाहीत, त्यांची सह्या मात्र हजेरी पत्रकावर दिसतात.
आदेश वरून येतात असं सांगून वरिष्ठ अधिकारी स्वतःला क्लीन चिट देतात, पण आदेशानुसार नावं बदलण्याचं एडिटिंग कोण करतं?

भ्रष्टाचारी अधिकारी आहे का?
🚨 सत्य हेच आहे का?
होमगार्ड जवान गरीब घरातून आलेले. कधी शेतात, कधी मोलमजुरी करून पोट भरतात. त्याचवेळी त्यांचे वरिष्ठ अधिकारी मात्र काळ्या पैशावर फोर व्हीलरमध्ये ऐश करत फिरतात? लाखो रुपयांचा हा भ्रष्टाचार प्रत्यक्षात कोटींचा खेळ झाला आहे का?
❗ जनता आणि जवानांना एकच मागणी –
या भ्रष्ट प्रमुखावर तातडीने कारवाई व्हावी.
वर्दी अनुदान व बंदोबस्ताच्या रकमेचा अधिकृत हिशोब जाहीर करावा.
ज्यांनी जवानांचे हक्काचे पैसे लाटले त्यांना जेलमध्ये डांबले जावे.
🔥 होमगार्ड जवानांच्या घामावर राजमहाल उभारणाऱ्या भ्रष्ट प्रमुखाचा हिशोब आज नागरिकांसमोर ठेवला आहे. आता जनता व जवानांनी मिळून या भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे आली आहे का?




