ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राजकीय वरदहस्तामुळे कटफळ केमिकल प्रकरण दाबले? अजित पवारांच्या जवळकीचा आरोप, नागरिकांमध्ये संताप केमिकल इंजिनियरशिवाय धोकादायक?


🔥MK NEWS36 

बारामती तालुक्यातील कटफळ येथील केमिकल फॅक्टरी प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गूढ? आणि संशयास्पद होत चालले आहे का?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

बारामती (कटफळ) |
कायद्याच्या चौकटीत पाहिले असता ही फॅक्टरी बेकायदेशीरच वाटत असताना, तपासात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाने आता प्रशासन, राजकीय हस्तक्षेप आणि कायदेशीर दुर्लक्ष यावर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
💢सप्लायर्सचा परवाना मालकाकडेच?
केमिकल व्यवसायासाठी आवश्यक असलेले सप्लायर्सचे लायसन्स या फॅक्टरीच्या मालकाकडे आहेत का? की इतर कोणाच्या नावावर परवाने वापरून काळा धंदा सुरू आहे? हा पहिला आणि मूलभूत प्रश्न आज नागरिक विचारत आहेत. कारण परवाना नसताना किंवा चुकीच्या नावावर केमिकलचा साठा व पुरवठा होणे म्हणजे थेट कायद्याची पायमल्ली.
🗞️मालकाकडे केमिस्ट/केमिकल इंजिनियरची पात्रता आहे का?
केमिकलसारख्या अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक व्यवसायासाठी केमिस्ट किंवा केमिकल इंजिनियरची शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. मात्र या कंपनीच्या मालकाकडे अशी कोणतीही डिग्री, तांत्रिक शिक्षण किंवा मान्यताप्राप्त पात्रता आहे का?
जर नाही, तर मग प्रश्न असा उभा राहतो की—
👉 अशा व्यक्तीला केमिकल व्यवसाय चालवण्याची परवानगीच कशी मिळाली?
अनुभवाशिवाय केमिकल व्यवसाय?
केमिकलचा व्यवसाय हा केवळ कागदोपत्री परवान्यांचा नसून अनुभवाचा, कौशल्याचा आणि जबाबदारीचा असतो.
मालकाला केमिकल हाताळणीचा अनुभव किती?
सप्लाय चेन, साठवणूक, सुरक्षितता नियम यांची माहिती आहे का?
🚨यामध्ये अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?
हे सर्व प्रश्न आज नागरिकांमध्ये जोरदार चर्चेचा विषय बनले आहेत.
एक्साईज रेड: तपास झाला की डोळेझाक?
या फॅक्टरीवर झालेल्या एक्साईज रेडमध्ये अधिकाऱ्यांनी हे सर्व मुद्दे तपासले होते का?
मालकाची शैक्षणिक पात्रता?
सप्लायर्सचे वैध लायसन्स?
अनुभव व तांत्रिक क्षमता?
की तपास केवळ कागदावरच झाला आणि खरे मुद्दे बाजूला ठेवण्यात आले?
रेडनंतर नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे संशय अधिकच बळावत आहे.
💥राजकीय वरदहस्तामुळे प्रकरण दाबले?
या संपूर्ण प्रकरणात आता सर्वात गंभीर आरोप पुढे येत आहेत.
👉 फॅक्टरीचा मालक हा अजित पवारांच्या जवळचा असून एका निर्वाचित नगरसेविकेचा पती असल्यामुळेच हे प्रकरण दाबले गेले आहे का?
जर हे खरे असेल, तर हा केवळ एक औद्योगिक गैरव्यवहार नसून प्रशासनावरचा राजकीय दबाव आणि कायद्याचा खून असल्याचे स्पष्ट होते.
नागरिकांचा सवाल – कायदा सर्वांसाठी समान आहे का?
सामान्य नागरिक, छोटे व्यापारी किंवा उद्योजक असते तर
परवाना नसताना व्यवसाय चालवू दिला असता का?
शिक्षण व अनुभव नसताना सूट दिली असती का?
मग इथे वेगळे निकष का?
MK NEWS36 उघडकीस आणणार सत्य
हे प्रकरण येथेच थांबणार नाही.
MK NEWS36 या केमिकल फॅक्टरी प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत राहणार असून, येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे समोर आणणार आहे.
सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न झाला तरी ते बाहेर येणारच.
🔥वाचत रहा – MK NEWS36🔥


Translate »
error: Content is protected !!