ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

‘मनोजला भेटा, धंदा सुरू करा’ इंदापूरमध्ये खुलेआम चर्चा; कलेक्शन कुणासाठी?


🔥MK NEWS36 

इंदापूर भ्रष्टाचाराचा अड्डा बनतोय का?
‘तुम्ही खा, मी बी खातो’ संस्कृतीला प्रशासनाचे अभय? नागरिकांमध्ये तीव्र संताप?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

इंदापूर तालुका सध्या भ्रष्टाचार, बेकायदेशीर धंदे आणि प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मटका, खुलेआम दारूविक्री, जुगार क्लब, वाळू माफिया आणि इतर अनधिकृत धंदे हे जणू काही इंदापूरमध्ये अधिकृतच झाले आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
विशेष म्हणजे, “कोणतंही बेकायदेशीर काम करायचं असेल—मटका असो, दारू असो, वाळू असो किंवा जुगार—तर ‘मनोज’ला भेटा” अशी चर्चा इंदापूर शहरात खुलेआम होत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये मनोज हे नाव वारंवार समोर येत असून, ते नेमकं कुणासाठी आणि कुणाचं कलेक्शन करतात का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
🚨नवीन पोलीस निरीक्षकांच्या काळात कारभार आणखी सैल झाला का?
इंदापूरला नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा होण्याऐवजी बेकायदेशीर धंद्यांना अधिकच उधाण आल्याचे चित्र दिसत आहे.
मटका खुलेआम, दारू खुलेआम, जुगार क्लब निर्धास्तपणे सुरू — मग पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे का, की यामागे काही वेगळीच ‘समजूत’ आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
✒️तरुण पिढी व्यसनाधीन — जबाबदार कोण?
इंदापूरमधील तरुण मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, दारू आणि इतर व्यसनांच्या विळख्यात सापडत आहेत. एक नाशा नव्हे, तर अनेक धंद्यांची सुस्वाट तालुक्यात सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
हे सर्व घडत असताना पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
💥भीक मागवा आंदोलनाचा इशारा — पुन्हा रस्त्यावर उतरणार?
यापूर्वी ‘भीक मागवा आंदोलन’ करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र परिस्थिती बदलण्याऐवजी अधिकच बिघडत चालल्याचा आरोप आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत काही सामाजिक व राजकीय कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे.
नावे उघड होणार? मोठे चेहरे अडचणीत येणार?
येणाऱ्या काळात मटका, दारू, वाळू आणि जुगार धंद्यांमागील खरे सूत्रधार, त्यांना संरक्षण देणारे घटक आणि आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्यांची नावे उघड होणार असल्याचा दावा काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
इंदापूरचा हा “अघोषित भ्रष्टाचार मॉडेल” कधी उद्ध्वस्त होणार, हा प्रश्न आता जनतेच्या मनात घर करून बसला आहे.
👉 हा सर्व प्रकार खरा असेल तर प्रशासन जबाबदार ठरणार का?
की पुन्हा एकदा ‘सगळं माहित असूनही शांतता’ हेच धोरण राहणार?
वाचत रहा – MK NEWS36
कारण पुढील खुलासे अधिक धक्कादायक असू शकतात…


Translate »
error: Content is protected !!