क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

“चार आधारस्तंभ, सात धंदेवाले आणि माफियांचा राजवट – कायद्याचा गॅस सुटला!”


MK NEWS 36/संपादकीय

“सुप्यात बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा उघड उघड धंदा – चार आधारस्तंभ, माफिया मंडळी आणि गॅस एजन्सींच्या आशीर्वादाने चालूच!”

BARAMATI/SUPE :सुपा परिसरात घरगुती गॅसचा बेकायदेशीर रिफिलिंग धंदा बेधडक सुरू असून, हा जीवघेणा खेळ रोखण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. नागरगाव, चौफुला, पाटस, फलटण, सोमेश्वर, स्थानिक मोरगाव आणि मेन कनेक्शन पंढरपूर–सोलापूरमार्गे येणाऱ्या भरलेल्या टाक्यांचा पुरवठा हे या धंद्याचे प्राणवायू ठरत आहेत. एवढ्या लांबून येणाऱ्या बेकायदेशीर टाक्या प्रशासन आणि संबंधित गॅस एजन्सींच्या ‘आशीर्वादा’शिवाय येऊच शकत नाहीत, हे उघड आहे.

एका गाडीत सहा टायर 360, दहा टायर 520 किंवा 525 टाक्या असतात. उतरायला तब्बल दोन ते तीन तास लागतात. एवढा वेळ गाड्या उभ्या राहूनही कोणतीही कारवाई होत नाही, कारण ‘कुंपण शेत खाते’ ही म्हण इथं वास्तव ठरते. स्थानिक प्रशासनाची शांत, बघ्याची भूमिका हा प्रकार आणखीनच संशयास्पद बनवते.

या काळ्या कारभाराचे ‘आधारस्तंभ’ – साळ_खे, वाघ..डे, आणि द..कर – हे दोन नंबरच्या धंदेवाऱ्यांना उघड संरक्षण देत असल्याची चर्चा आहे? याशिवाय, मयू_र चांदगुडे, अम_र कदम, भानुदा_स चांदगुडे, कुमा_र चांदगुडे, राहु_ल भोंडवे, कुलदी_प चांदगुडे, शशिकां_त चांदगुडे ही मंडळी प्रत्यक्ष धंदा राबवणाऱ्यांच्या यादीत आहेत.

जे गॅस एजन्सी या माफियांना कच्चा माल म्हणजे भरलेल्या टाक्या पुरवतात, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

मात्र पोलीस,तहसीलदार आणि पुरवठा विभागाने जाणीवपूर्वक या धंद्याकडे कानाडोळा केला आहे.तरी कारवाई न करणे, हा प्रकार उघड राजकीय संगनमताचा पुरावा ठरत आहे..


Translate »
error: Content is protected !!