ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

महिला व पुरुष कर्मचारी अडचणीत; नगरपरिषदेकडे बायो टॉयलेटची मागणी


🔥MK NEWS 36 

दौंड आगारात शौचालयाची समस्या; कर्मचाऱ्यांना बायो टॉयलेटची मागणी

कोमल सोनवणे
दौंड प्रतिनिधी │ 29 ऑगस्ट 2025

दौंड – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे विभागातील दौंड आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर तोडकाम सुरू झाले आहे. तिकीट व रोकड विभाग, चालक-वाहक विश्रांतीगृह, आगार व्यवस्थापक निवासस्थान, महिला विश्रांतीगृह तसेच पाण्याच्या टाकीचे तोडकाम ३० ऑगस्ट २०२५ पासून सुरू करण्यात आले आहे.

या तोडकामामुळे सध्या आगारातील कर्मचारी वर्गासाठी मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पुरुष व महिला कर्मचारी यांच्यासाठी शौचालयाची कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर दौंड आगार व्यवस्थापकांनी दौंड नगरपरिषद तसेच पंचायत समिती दौंड यांना लेखी निवेदन देऊन तातडीने बायो टॉयलेटची व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे. तोडकाम सुरू असताना पर्यायी शौचालयाची सोय नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपरिषद व पंचायत समिती प्रशासनाकडून याबाबत तातडीने कार्यवाही होऊन शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार का, याकडे दौंडकरांचे लक्ष लागले आहे.


Translate »
error: Content is protected !!