ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

भोसरीत जवानाची दुचाकी चोरीला; नागरिकांना शोधात मदतीचे आवाहन 🚨


🔥MK NEWS 36

भोसरीत जवानाची दोन चाकी चोरीला; नागरिकांना आवाहन — गाडी दिसल्यास तात्काळ संपर्क साधा

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी शैलेश):
भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन चाकी चोरीची आणखी एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही चोरी झालेली गाडी एका जवानाची असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान भोसरी सहक केंद्र परिसरातून ही दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात FIR क्रमांक 0518/2025 दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.50 वाजता नोंदविण्यात आली आहे.

सदर दुचाकीचे क्रमांक MH 14 FZ 2911 असून ती आपल्या देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या जवानाची आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

भोसरी पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे आणि संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ही दुचाकी कोणाला दिसल्यास किंवा तिची काही माहिती मिळाल्यास 7040103122 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पोलिसांनी नागरिकांना आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लॉक करून ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.


Translate »
error: Content is protected !!