सोनवडी गावात जुन्या वैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी – परस्परांवर गुन्हे दाखल..!
🔥MK NEWS 36
सोनवडी गावात जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी – परस्परांवर गुन्हे दाखल
कोमल सोनवणे
प्रतिनिधी, दौंड
दौंड तालुक्यातील सोनवडी गावात जुन्या वैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगड, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांचा वर्षाव झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत दोन्ही गटातील लोक जखमी झाले असून परस्परांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
📌 पहिला गुन्हा:
फिर्यादी इक्बाल इमाम सय्यद (वय 35, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. सोनवडी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा.र.नं. 635/2025 नोंदविण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता सोनु राजु राठोड व अरूण विश्वनाथ चव्हाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून सोहेल सय्यद यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास गेलेल्या इक्बाल सय्यद यांनाही सोनु राठोड याने बुक्क्यांनी मारहाण केली तर अरूण चव्हाण याने शब्बीर सय्यद याच्या डोक्यात काठीने प्रहार केला. याशिवाय सलीम सय्यदलाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार आहे.
📌 दुसरा गुन्हा:
याउलट, सोनु राजु राठोड (वय 23, रा. सोनवडी तांडा) यांच्या तक्रारीवरून गुन्हा.र.नं. 636/2025 दाखल झाला आहे. त्यानुसार, त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता शबीर सय्यद, सलीम सय्यद व इक्बाल सय्यद या तिघांनी शाळेत झालेल्या जुन्या वादातून शिवीगाळ करत त्याच्यावर, त्याचा चुलत भाऊ कुणाल राठोड आणि मित्र अरूण चव्हाण यांच्यावर हाताने व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची नोंद आहे.
दोन्ही बाजूंकडून दाखल झालेल्या तक्रारींवर पोलिसांनी BNS कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. दाखल अमलदार म्हणून पो. हवा. 3327 घाडगे तर तपास अमलदार म्हणून पो. हवा. 2458 राऊत व 1158 यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे दौंड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.




