ताज्या घडामोडीशिक्षण

जनता विद्या मंदिर मुरुड प्रशालेत SSC बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न


मुरुड लातूर तालुक्यातील मुरुड येथील जनता विद्या मंदिर चे विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेतलेले तब्बल 75 विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने गौरव करण्यात आला या गौरव समारंभासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव मेश्राम सर अध्यक्षस्थानी होते तसेच यावेळी राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे आयुक्त व माजी विद्यार्थी संतोष राऊत तसेच प्रमुख उपस्थिती धाराशिव चे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर तानाजी लाकाळ डॉक्टर रवींद्र लोमटे हे उपस्थित होते

या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री वैभव सापसोड,उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच रुरल एज्युकेशन सोसायटीचे श्री दीपक पाटील श्री जयश्री पाटील श्री धनंजय नाडे यासह उपमुख्यधापक डीव्ही जाधव पर्यवेक्षक अरुण पाटील तनुजा कोष्टी प्रशांत पाटील हेही उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामकृष्ण देशपांडे सर व श्री शिवाजी एलवरती सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अरुण पाटील सर यांनी केले, लातूर पॅटर्नचे नाव उज्वल करण्यात मुरुडच्या विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा राहिला


Translate »
error: Content is protected !!