ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“योगेश महाडिक मित्रपरिवाराचा पुढाकार; सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला वेग”


🔥MK NEWS36 

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेणुका नगरमध्ये घोंगडी बैठक; सुनेत्रा(वहिनी) पवार यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

बारामती : आगामी विधानसभा पोटनिवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून विविध भागांत बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने रेणुका नगर येथे मा. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठकीचे आयोजन उत्साहात पार पडले.

या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन योगेश भैय्या महाडिक मित्रपरिवार, रेणुका नगर यांच्या वतीने करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला.

बैठकीस नगरसेवक राजेंद्र नाना सोनवणे, माजी नगरसेवक विजय खरात, नगरसेवक गणेश काका जोजारे, जनसेवक व युवा नेते प्रतीक ढवाण पाटील, युवा नेते विशाल भैय्या जाधव, माजी नगरसेवक बाळासो गायकवाड, साधू मामा बल्लाळ, अस्लम रज्जाक तांबोळी, सौ. अनिताताई गायकवाड, योगेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच विकासकामांचा धागा कायम ठेवण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीदरम्यान रेणुका नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुनेत्रा वहिनींना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात येत नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

एकूणच, या घोंगडी बैठकीमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Translate »
error: Content is protected !!