क्राईम

इंदापूर हे हादरले भर चौकात गोळीबार…


आज दुपारच्या सुमारास बारामतीमध्ये एका युवकाची कोयत्याने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण बारामती परिसर हादरून निघाला होता..या घटनेला काही तासच होत नाही तोपर्यंत अशातच आता इंदापूर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. इंदापूर शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..

या गोळीबारात सदरील गंभीर जखमी झाला असून या युवकाला तातडीने उपचारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.ज्या युवकावरती गोळीबार झाला त्याचे नाव अद्यापही समजू शकले नसले तरी इंदापूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणी वरती आला आहे..

गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर शहरात भर चौकात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरही असा भ्याड हल्ला झाला होता.यानंतर काही दिवसातच या युवकावर गोळीबार झाल्याने इंदापूर शहरात कायदा व सुव्य सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याचे चित्र पाहायला मिळतेय. अशा घटना जर सातत्याने होत राहिल्या, तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही अशी दबक्या आवाजात नागरिकांच्या देखील चर्चा सुरू आहे…

बारामती व इंदापूर राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे व शांतता प्रिय असे दोन्ही तालुके ओळखले जातात पण आज एकाच दिवशी दोन अशा घटना घडल्या की सर्वेकडे चर्चा व खळबळ उडून गेले या दोन्ही गोष्टी खूप गंभीर याकडे स्थानिक आमदार व खासदार लक्ष देतील का हा पण चर्चेचा विषय आहे

पोलीस प्रशासनाचा दबाव  गुन्हेगारांवर राहिला नाही दिवसाढवळ्या सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत याकडे पोलीस प्रशासन लक्ष देईल का नाही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय…


Translate »
error: Content is protected !!