ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राची CEO गजानन पाटील यांच्याकडून पाहणी; आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश”


🔥MK NEWS36 

निरवांगीच्या मॉडेल PHC ला पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट; रुग्णसेवेचे केले कौतुक

निरवांगी ( प्रतिनिधी सागर समिंदर) :

इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास (मॉडेल PHC) पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. गजानन पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन आरोग्य केंद्रातील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील स्वच्छता, शिस्त आणि तत्पर रुग्णसेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग (OPD), औषध साठा कक्ष, स्वच्छता व्यवस्था, रुग्णांसाठी उपलब्ध सोयी-सुविधा आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला.

आरोग्य केंद्राच्या पुढील विकासासाठी आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना देऊन ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी (BDO) श्री. सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ मॅडम, जिल्हा परिषदेचे मा.गटनेते श्रीमंत ढोले, पंचायत समितीचे उपसभापती जयकुमार कारंडे, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, शेंडे साहेब, निरवांगी गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्रीमती रणवरे मॅडम आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ताटे सर, डॉ. हेंद्रे सर, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) डॉ. हेगडकर, गावचे पोलीस पाटील, पत्रकार आणि आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता. मॉडेल PHC च्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना गतीने आणि उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य पथक करत असलेल्या प्रयत्नांचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.


Translate »
error: Content is protected !!