ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जनशक्ती संघटनेच्या आंदोलनाला यश; ठेकेदारांना कारवाईच्या सूचना..!


🔥MK NEWS36

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे तोडगा काढण्याचे आश्वासन

बारामती : बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने नगरपरिषदेसमोर सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणाची नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, नगरसेवक व जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत नगराध्यक्ष सचिन सातव यांनी लेखी पत्र देत कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत ठेकेदारांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही विभागांच्या ठेकेदारांनी तात्काळ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कामगारांच्या मागण्यांबाबत योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष सातव यांनी दिल्यानंतर जनशक्ती कंत्राटी कामगार संघाने सध्या सुरू असलेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असेही स्पष्ट केले.

प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ सातत्याने लढा देत राहणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी सांगितले.

या वेळी उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, गटनेते संजय संघवी, विरोधी पक्ष नेत्या आरतीताई शेंडगे (गव्हाळे), नगरसेवक राजेंद्र सोनवणे, अमर धुमाळ, अमोल कावळे, सोमनाथ गजाकस, विशाल हिंगणे उपस्थित होते.

तसेच जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे शहराध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सहसंघटक ओम शिंदे, महिला शहराध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!