क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“झिरो पोलीस” नावाखाली वाहतुकीत वसुलीचा खेळ – नागरिकांना प्रश्न, या मागे कोणाचा आशीर्वाद?


🔥MK NEWS 36 

दिवाळीच्या उत्साहात बारामतीत ‘झिरो पोलीस’ हप्त्यांचा नवा खेळ?

(प्रदीप गायकवाड मुख्य संपादक,MK NEWS 36)

— बारामती

एकीकडे बारामती शहरात दिवाळीचा जल्लोष, गोड गोड फराळ, आणि उजळलेले रस्ते — तर दुसरीकडे पोलिसांच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘झिरो हप्ता’ वसुलीचा थरारक खेळ सुरू झाल्याचे समोर येत आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत ट्रान्सपोर्ट कंपनी, लेबर पुरवठा करणारे, व्हेन चालक, तसेच सहा चाकी वाहने मालक यांच्याकडून नियमित “हप्ता” उकळला जात असल्याचा आरोप परिसरात गाजत आहे.

नागरिकांकडून येणारी तक्रार अशी की — बाहेरगावावरून आलेले काही व्यक्ती, जे स्वतःला “झिरो पोलीस” म्हणवतात, ते बारामतीपासून आठ ते दहा किलोमीटरवर येऊन मोठ्या ट्रान्सपोर्टर्सकडून, व्हेनवाल्यांकडून व ठेकेदारांकडून “दिवाळी गिफ्ट”च्या नावाखाली पैसे उकळत आहेत. या कारभाराला “आशीर्वाद” कोणाचा, हा प्रश्न आता नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

अनेक ट्रान्सपोर्टर सांगतात की, “गाडी पकडली की एका ‘झिरो पोलिसाचं’ नाव घेतलं की गाडी लगेच सोडली जाते. म्हणजेच काही ठिकाणी पैसे गेले तर काम होतं, आणि जे नाही देत त्यांना नियम दाखवले जातात!”

यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा व्यवहार खुलेआम होत असूनही प्रशासन शांत आहे. गोरगरिबांवर वाहतुकीची शिस्त दाखवली जाते, छोट्या व्हेनवाल्यांना नोटिसा दिल्या जातात, तर दुसरीकडे मोठ्या ट्रान्सपोर्टर्सना “सूट” दिली जाते, अशी जनतेत चर्चा रंगली आहे.

“झिरो पोलिस” म्हणजे नेमके कोण? त्यांचा संबंध तालुका पोलीस ठाण्याशी आहे का? आणि त्यामागे कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे का? — हे प्रश्न सध्या बारामतीकरांच्या तोंडी ऐकायला मिळतात.

दिवाळीचा उत्सव असताना, या “हप्ता गिफ्ट”च्या गोष्टींनी नागरिकांच्या कपाळावर आठ्या उमटवल्या आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पारदर्शक तपासणी करावी, अशी जनतेची मागणी आहे.


Translate »
error: Content is protected !!