विधानसभेचा महासंग्राम: आचारसंहिता लागू राजकीय वातावरण तापले….
आचारसंहिता लागू: निवडणूक प्रक्रिया …..
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने आजपासून आचारसंहिता लागू केल्याचे जाहीर केले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकार तसेच सर्व राजकीय पक्षांना विशिष्ट नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमांमुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यास मदत मिळते.
आचारसंहितेची मुख्य नियमावली:
1. कोणत्याही प्रकारची घोषणा, शिलान्यास किंवा उद्घाटने करता येणार नाहीत.
2. मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणतेही वित्तीय आश्वासने देता येणार नाहीत.
3. प्रचारासाठी सरकारी यंत्रणा आणि साधनांचा गैरवापर करता येणार नाही.
4. जात, धर्म किंवा भाषेच्या आधारावर मत मागणे निषिद्ध आहे.
निवडणूक आयोगाचे आवाहन निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना आणि उमेदवारांना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांनी देखील या काळात निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




