“फक्त पावत्या आणि अतिक्रमण? ट्राफिक पोलिसांचं काम की थाट?”
MK NEWS 36/ संपादकीय..
तीन निष्पाप जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार का?
ट्रॅफिक पोलीस नित्यनियमाने आपलं काम करतील की पुन्हा फक्त पावत्या आणि अतिक्रमणात व्यस्त?
बारामती – काल महात्मा फुले चौकात झालेल्या भीषण अपघातात एका वडिलांसह त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. व याचा धक्का सहन न झालेले आजोबांचाही मृत्यू या हृदयद्रावक घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असतानाही प्रशासनाच्या व पोलीस खात्याच्या उदासीनतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे..
हा चौक अत्यंत वर्दळीचा असून देखील येथे ना ट्राफिक पोलिसांचा बंदोबस्त असतो, ना वाहतूक नियंत्रणाची कोणतीही ठोस व्यवस्था. प्रशासन केवळ व्हीआयपी दौऱ्यांवेळीच जागं होतं, बाकी वेळेस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप नागरिक करत आहेत.
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाचा मुद्दा पुढे येतोय – आता तरी ट्राफिक पोलीस नित्यनियमाने आपली जबाबदारी पार पाडतील का? की नेहमीप्रमाणे फक्त पावत्या फाडणं, फेरीवाल्यांवर कारवाई करणं आणि गोरगरीबांच्या अतिक्रमणावर लक्ष केंद्रित करणं हेच त्यांचं प्रमुख काम राहील?
शहरातील नागरिक आता थेट प्रशासनाला विचारत आहेत –
“आमच्या जिवाला किंमत आहे की नाही?”
“ट्राफिक पोलीस खरोखर वाहतुकीसाठी आहेत की केवळ दंड गोळा करण्यासाठी?”
दुर्दैवाने, प्रशासनाचे आणि पोलीस यंत्रणेचे हे मौन आणखी एखाद्या कुटुंबाचा उध्वस्त संसार होईपर्यंतच टिकणार का?
आता तरी कृती होईल की पुन्हा एखाद्या बातमीत केवळ मृत्यूच्या आकड्यांपुरताच विषय मर्यादित राहील?




